तुम्ही गोबी नावाच्या वृक्ष गॉब्लिनच्या रूपात खेळता. तुम्हाला सर्वशक्तिमान ओक रक्षकाचे पद लाभले आहे. तुम्हाला आजूबाजूच्या वनचरां(प्राण्यां)पासून शक्तिशाली जादुई ओक वृक्षाचे रक्षण करायचे आहे. तुम्हाला वृक्ष जिवंत ठेवायचा आहे, अन्यथा तो मरेल आणि जंगल दूषित होईल. तुमच्या मदतीला उपयुक्त वनस्पती असतील आणि तुम्ही शक्तिशाली ओक वृक्षाला भरपूर सूर्यप्रकाश व पाणी द्याल, जेणेकरून तो मोठा, बळकट आणि शक्तिशाली होत जाईल.