तुम्ही एकमेव सैनिक आहात जे शत्रू आणि तुमच्या तळाच्या मध्ये उभे आहात. तळ ठोकून बसा आणि शत्रूचे सैनिक तुमच्या तळांवर चाल करून येतील तेव्हा त्यांना टिपून मारा. प्रत्येक मारलेल्या शत्रूमागे तुम्हाला रोख रक्कम मिळेल, ज्याचा उपयोग तुम्ही तुमचे शस्त्र श्रेणीसुधारित करण्यासाठी, मदत मागवण्यासाठी आणि तळ दुरुस्त करण्यासाठी करू शकता. तुम्हाला ग्रेनेड, स्वयंचलित शस्त्रे घेतलेले सैनिक, अगदी प्रचंड अग्निशक्तिने सुसज्ज असलेले ट्रक आणि रणगाडे यांचा सामना करावा लागेल. कुंपण बांधा, तुमच्या तळावर सैनिक जोडा, ग्रेनेड फेका आणि हवाई हल्ले बोलवा. प्रत्येक तळावर 10 दिवस टिका आणि तुम्हाला पुढच्या तळावर जाण्याची संधी मिळेल. शत्रूला रोखा आणि तुमचे सर्व तळ वाचवा, म्हणजे तुम्ही राष्ट्रीय नायक व्हाल!