हे कलरिंग बुक लहान मुलांसाठी उत्तम आहे, ज्यांचा रंगांशी पहिला संपर्क येत आहे. त्यांना निळा, हिरवा, लाल, गुलाबी आणि नारंगीच्या वेगवेगळ्या छटा असलेली तीन कलर पॅलेट्स निवडता येतील. मुलांना कोणतं चित्र रंगवायचं आहे, हे सुद्धा ते ठरवू शकतात. यासाठी ते चार वेगवेगळ्या श्रेणींमधून निवड करू शकतात: प्राणी, वाहतुकीची साधने, व्यवसाय आणि खाद्यपदार्थ. प्रत्येक श्रेणीत सहा चित्रं आहेत, त्यामुळे एकूण तुमचं बाळ २४ चित्रांमधून निवड करू शकतं. त्याच्या कल्पनाशक्तीला पंख देण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.