ब्रिक्स ब्रेकिंग या खेळात वेगवेगळ्या रंगांच्या विटांचा एक ग्रिड असतो. जेव्हा तुम्ही ग्रिडवर क्लिक करता, तेव्हा एकाच रंगाच्या सर्व विटा फुटतात, कोसळतात आणि उर्वरित विटा एकत्र येतात. खेळताना जर तुम्हाला असे आढळले की, एकटी वीट काढल्याने मदत होईल, तर जादूची काठी वापरा आणि यामुळे तुमचा खेळ अधिक काळ चालेल. जेव्हा तुमच्याकडील जादूच्या काठ्या संपतात आणि तुम्ही गटांमध्ये विटा नष्ट करू शकत नाही, तेव्हा खेळ संपतो. वेळ घालवण्यासाठी ब्रिक्स ब्रेकिंग हा क्लासिक खेळ आव्हानात्मक असला तरी खूपच छान आहे!