Battle Royale Gangs एक टीम डेथमॅच शूटिंग गेम आहे. तुमचा अवतार तयार करा, निळा आणि लाल यापैकी निवडा आणि मग तुमच्या शत्रूंना मारा! हा खेळ जास्त करून टीमवर्कवर आधारित आहे. लपून तुमच्या विरोधकांना शोधा आणि त्यांना मागून मारा. दबक्या पावलांनी जा आणि जेव्हा त्यांना कमीत कमी अपेक्षा असेल तेव्हा त्यांना संपवा! जो संघ सर्वात आधी पूर्णपणे मारला जाईल तो खेळ हरेल, त्यामुळे तुमच्या टीमला जिवंत ठेवा आणि त्यांना शक्य तितकी मदत करा. कारण हा खेळ फक्त तुमच्याबद्दल नाही, तो तुमच्या गँगबद्दल आहे!
इतर खेळाडूंशी Battle Royale Gangs चे मंच येथे चर्चा करा